वेंगुर्ला /-
रेडी यशवंत गड ते सिद्धेश्वर मंदिर बंधारा नूतनीकरण करावे या मागणी चे निवेदन माजी खासदार निलेश राणे यांना देण्यात आले. बंधारा नसल्याने तौक्ते वादळात पूर्ण समुद्राचे पाणी यशवंत गड तसेच वाडीत आणि लोकांचा माड बागायतीत घुसून पूर्ण नुकसान झाले. जमिनीची पूर्ण धूप झाली आहे.भविष्यlत मनुष्य हानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही.४०० मीटर पक्का बंधारा होणे गरजेचे आहे.तौकते वादळत महसूल तसेच पत्तन विभाग ची स्थळ दर्शक पाहणी झाली आहे. निलेश राणे यांनी आपण स्वतः लक्ष घालून बंधाऱ्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी जि.प. सदस्य प्रितेश राऊळ, रेडी सरपंच रामसिंग राणे.सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम राणे आदी उपस्थित होते.