You are currently viewing अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून शेती मशिन देखभाल दुरुस्ती,भातकापणी कार्यशाळा संपन्न..

अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र यांच्या माध्यमातून शेती मशिन देखभाल दुरुस्ती,भातकापणी कार्यशाळा संपन्न..

सावंतवाडी/-

अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्र सावंतवाडी यांच्या विद्यमाने शालेय विद्यार्थी, शिक्षक, शेंडोबा माऊली महिला संघ व देवसू ग्रामस्थांच्या उपस्थितीत आज शेती मशीन देखभाल व दुरुस्ती कार्यक्रम साजरा झाला. मशीनद्वारे भातकापणी प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी अन्नपूर्णा कृषी सेवा केंद्राच्या संचालिका व सावंतवाडी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, कर्मचारी उदय गावडे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुहासिनी तळगावकर, देवसु-दाणोली सरपंच संजना संतोष सावंत, स्मिता देसाई, रसिका सावंत, उर्मिला सावंत, सानिका सावंत, प्रतिक्षा सावंत, अनिता देसाई, रसिका सावंत, सोमा सावंत, रघुनाथ सावंत, सुरेंद्र देसाई, सुमेध सावंत, गोविंद सावंत, प्रकाश सावंत, तुकाराम सावंत, विश्‍वास सावंत, धमेंद्र सावंत, दिनेश सावंत, राजन सावंत, विजय मेस्त्री, संतोष जाधव, महेश जाधव, राजेश जाधव, बाबूराव देऊसकर, बप्पा देऊसकर, काशिनाथ जाधव, बबन जाधव तसेच शेतकरी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..