You are currently viewing निगुडे तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी सैनिक वासुदेव गावडे यांची बिनविरोध

निगुडे तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी सैनिक वासुदेव गावडे यांची बिनविरोध

सावंतवाडी /-

निगुडे तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी सैनिक वासुदेव लक्ष्मण गावडे उर्फ नाना खडपकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निगुडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा दिनांक २५ ऑक्टोंबर २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय निगुडे या ठिकाणी पार पडली. यावेळी मावळते तंटामुक्ती अध्यक्ष महादेव आत्माराम नाईक यांचा निरोप समारंभ करण्यात आला व तंटामुक्ती अध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी श्री वासुदेव लक्ष्‍मण गावडे यांचे नाव सूचक माजी सरपंच श्री जयराम गवंडे यांनी केली एक मताने श्री वासुदेव लक्ष्‍मण गावडे यांची निवड तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निगुडे सरपंच श्री समीर गावडे, उपसरपंच श्री गुरुदास गवंडे, ग्रामपंचायत सदस्या लक्ष्मी दळवी, समीक्षा गावडे, वर्षा जाधव, ग्रामसेवक तनवी गवस, तलाठी भाग्यलक्ष्मी शिंदे, कृषी सहाय्यक श्वेता बेळगुंदकर, पोलीस पाटील सुचिता मयेकर, माजी उपसरपंच भिकाजी गावडे, माजी ग्रा. पं. सदस्य वसंत जाधव, वनधिकारी श्री धुरी, पशुवैद्य अधिकारी डॉ.श्री फणसेकर , वायरमन श्री शुभम गावकर, संजना सावळ, मार्शल गुडीनो, अरुण शेगडे, पुनाजी रेडकर, प्रियांका गावडे, महादेव नाईक ,आशा सेविका भाग्यलक्ष्मी मोरजकर, अंगणवाडी सेविका प्रियंका राणे, रंजना सावंत, नूतन निगुडकर, मदतनीस लक्ष्मी पोखरे, विजयालक्ष्मी शिरसाट आदी उपस्थित होते मावळते तंटामुक्ती अध्यक्ष महादेव आत्माराम नाईक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन नूतन अध्यक्ष वासुदेव लक्ष्मण गावडे यांचे स्वागत करण्यात आले व शुभेच्छा देण्यात आले.

तसेच मडुरा पशुवैद्य दवाखाना या ठिकाणी गेले एक वर्ष पद रिक्त होते त्याजागी नवीन नियुक्ती झालेले पशुवैद्य अधिकारी डॉ. श्री. फणसेकर यांचेही पुष्पगुच्छ देऊन निगुडे सरपंच श्री समीर गावडे यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अभिप्राय द्या..