You are currently viewing सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी यांचा उद्द्या होणार सत्कार

सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी यांचा उद्द्या होणार सत्कार

सावंतवाडी /-

सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन पालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात दि. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमास नगराध्यक्ष संजू परब उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात नगरपरिषद कर्मचाऱ्यांची गुणवंत पाल्ये, शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयाचे दहावी ते बारावीतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी आणि 26 जानेवारीनिमित्त पालिकेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सच्चिदानंद उर्फ संजू परब यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती दिपाली सावंत यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..