कुडाळ /-

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आमदार स्थानिक विकास निधी व नगरोत्थान निधीतून कुडाळ शहरात रस्ते, गटारांचे बांधकाम,संरक्षण भिंत अशी विविध विकास कामे मंजूर करून घेतली आहेत. या कामांची भूमिपूजने आज आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. विकासाच्या बाबतीत कुडाळ शहर अग्रेसर बनवायचे आहे. कुडाळ शहरात याआधीही अनेक विकास कामे मार्गी लावण्यात आली असून कुडाळ वासियांच्या मागणीनुसार नव्याने कोट्यवधींची कामे मंजूर करून घेतली आहेत.येत्या काळातही शासनाच्या प्रत्येक योजनेतुन जास्तीत जास्त निधी मतदार संघात आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.

यामध्ये कुडाळ नगरपंचायत हद्दीतील वक्रतुंड कॉमप्लेक्स येथे संरक्षण भिंत बांधणे, हेरेकर घर ते कुलकर्णी चाळीपर्यंत गटार बांधणे, शिरहट्टी सर घर ते वेतुरेकर घरापर्यंत गटार बांधणे व गटरावर फरशा बसविणे, आरोलकर घर ते पाटकर घरापर्यंत दुतर्फा गटार बांधणे, रेल्वे स्टेशन ते मस्जिद मोहल्लापर्यंत दुतर्फा बंधिस्त गटार बांधणे, कुडाळ सांगीर्डेवाडी येथे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे व गटार बांधणे, कुडाळ लक्ष्मी मंदिर ते आळवे घरापर्यंत गटार बांधणे याकामांची भूमिपूजने करण्यात आली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते,कुडाळ नगरपंचायत मुख्याधिकारी नितीन गाढवे, तालुकाप्रमुख राजन नाईक,तालुका संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शहरप्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे, राजू गवंडे, सुशील चिंदरकर, रुपेश पावसकर, सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर,समील जळवी,मेघा सुकी, नितीन सावंत,संदीप म्हाडेश्वर, कृष्णा तेली, योगेश धुरी, चेतन पडते,साईश घुर्ये, तेजस्वी परब,अनिल राणे, विजय परब, उदय मांजरेकर, विलास राणे, अर्जुन परब, चंद्रशेखर बाईत, सत्यवान कांबळी, ईजाद नाईक, कादर खान, नागेश जळवी, विठोबा चव्हाण, दीपक राणे, भरत चव्हाण, सदाशिव राणे, प्रदीप राणे, आदिंसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page