You are currently viewing फणसगांव येथे प्लॅस्टिक कचरा संकलन.;नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गचा उपक्रम..

फणसगांव येथे प्लॅस्टिक कचरा संकलन.;नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गचा उपक्रम..

देवगड /-

नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गच्या स्वच्छ भारत अभियानमध्ये देवगड तालुक्यातील फणसगाव माध्यमिक विद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगांव यांनी सहभाग घेतला. विठ्ठलादेवी येथील हे स्वच्छ भारत अभियान नेहरु युवा केंद्र देवगड सिंधुदुर्गच्या रीना दुदवडकर यांनी आयोजन केले.

सोमवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी विठ्ठलादेवी गावात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. गावाच्या विविध भागात स्वच्छता मोहीम घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उंडिल तिठा, फणसगांव कॅन्टीन येथील प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन केले. फणसगांव विद्यालयाचे विद्यार्थी आणि कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगांवचे NSS स्वयंसेवक तसेच इतर विद्यार्थी या अभियानात सहभागी झालेले. सुमारे ५०-५५ विद्यार्थ्यांनी ही मोहीम यशस्वी केली. विद्यार्थ्यांनी जवळपास ६३ किलो प्लॅस्टिक कचऱ्याचे संकलन केले. विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

स्वतःच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावाच पण इतर ठिकाणीही स्वच्छ्ता राखावी असा विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजवणारा संदेश मुख्याध्यापिका पूजा कोरगावकर यांनी केले.

यावेळी प्राचार्य ए. एम. ढेकणे, मुख्याध्यापिका पूजा कोरगावकर, नेहरु युवा केंद्र देवगड सिंधुदूर्ग च्या रीना दुदवडकर, NSS विभाग प्रमुख- पवार आर. पी., नारकर, चव्हाण मॅडम, पोळ, कोकरे, कदम, करंदीकर, पाटील, साटम, कल्पेश नारकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..