You are currently viewing वराड-कुसरवे येथील आभाळमाया ग्रूपचाकडून आनंदाश्रय मधील रुग्णांसाठी पाच हजार रुपयांची मोफत औषधे वितरीत..

वराड-कुसरवे येथील आभाळमाया ग्रूपचाकडून आनंदाश्रय मधील रुग्णांसाठी पाच हजार रुपयांची मोफत औषधे वितरीत..

मालवण /-

मालवण तालुक्यातील “आभाळमाया ” वॉट्सप ग्रूपचे सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा नगरपालिका शाखा अधिकारी जयंत जावडेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना पणदुर येथील आनंदाश्रय या आश्रमातील निराधार रुग्णांसाठी पाच हजार रुपये किंमतीची औषधे मोफत उपलब्ध करून दिली. सदर औषधे आभाळमाया ग्रूपचे सदस्य राकेश डगरे आणि समीर रावले यांनी बुधवारी आनंदाश्रय च्या व्यवस्थापकांकडे सुपूर्द केली.

जुलै २०२१ मध्ये स्थापन झालेल्या वॉट्सप ग्रूपने गेल्या चार महिन्यात अनेक सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवून समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

अभिप्राय द्या..