You are currently viewing दिवाळी सणाच्या तोंडावर कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नका.;राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी.

दिवाळी सणाच्या तोंडावर कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नका.;राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी.

सावंतवाडी /-

थकीत वीज बिलांच्या वरून ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर वीज ग्राहकांचा वीज पुरवठा तोडला जात आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली आज उपकार्यकारी अभियंता एस.एस.भुरे यांची भेट घेत सणाच्या तोंडावर वीज कनेक्शन तोडू नये अशी मागणी केली.तर व्यापारी वर्गाची वीज कापल्यानं केल्यानं मालाच मोठ नुकसान होत आहे. त्यामुळे वीज कनेक्शन कट न करता सणात सहकार्य करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांना केलं. तर सर्वसामान्यांनच्या व्यथांबाबत वरिष्ठांच, सरकार मधील मंत्र्यांच लक्ष वेधल आहे अशी माहिती पुंडलिक दळवी यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, आगोस्तीन फर्नांडिस, अफरोज राजगुरू, असलम खतिब, अर्षद बेग, आसिफ ख्वाजा, किशोर परब, संजय पालव, जाफर खानापुरी, इन्सुली, बांदा येथील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..