You are currently viewing उद्या २८ऑक्टोबरला काँग्रेसचे कुडाळ रेल्वेस्थानक आंदोलन.;तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांची माहिती.

उद्या २८ऑक्टोबरला काँग्रेसचे कुडाळ रेल्वेस्थानक आंदोलन.;तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांची माहिती.

कुडाळ /-

कुडाळ तालुका काँग्रेसच्या वतीने कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या अंदाधुंदी कारभाराविरोधात आवाज उठविण्यासाठी उद्या गुरुवार दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ रेल्वेस्थानक येथे आंदोलन करायचे आहे. सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रेल्वे मार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी रिक्षा चालक वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन अभय शिरसाट कुडाळ तालुका काँग्रेस प्रभारीअध्यक्ष यांनी केले आहे.
*१)कोकण रेल्वे मार्गावरील कोवीड स्पेशल ट्रेन च्या नावाखाली कोकणातील कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या जनतेची लुट थांबण्यासाठी.
*२)ज्येष्ठ नागरिक व अपंग यांना देण्यात येणारी सवलत कोविड स्पेशल ट्रेनच्या नावाखाली बंद केली आहे ती पूर्ववत सुरू करण्यासाठी.
*३)कोकण रेल्वे मार्गावरील धावणाऱ्या सर्व रेल्वे रेल्वेना तात्काळ बुकिंग ची सेवा पूर्ववत करण्यासाठी.
४)मेंगलोर एक्सप्रेस या गाडीला कुडाळमध्ये थांबा मिळवण्यासाठी.वरील सर्व मागण्यांचा एक महिन्याच्या आत विचार न केल्यास कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे मार्ग बंदसाठी चक्का जाम आंदोलन पुकारण्यात येईल असा ईशारा काँग्रेसकडून देण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..