You are currently viewing फरुळेत ७ जानेवारीपासून एकांकिका स्पर्धा सुरू..

फरुळेत ७ जानेवारीपासून एकांकिका स्पर्धा सुरू..

फरुळे /-

परुळे युवक कला क्रीडा मंडळ,परुळे आयोजित स्व. अॅड. अभयकुमार देसाई स्मृति राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यावर्षी दि.७ ते ९ जानेवारी २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत.हे स्पर्धेचे ३१ वे वर्ष आहे. स्पर्धेतील प्रथम चार विजेत्यास अनुक्रमे रु.१००००/-,७०००/-,५०००/-,व २०००/- अशी सांघिक व इतर वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघानी प्रवेश फी रु.५०० व अनामत रक्कम रु५०० भरुन दि.२५ डिसेंबर पर्यंत नाव नोंदणी करावयाची आहे.प्रथम येणाऱ्या १२ संघांस स्पर्धेत प्रवेश देण्यात येईल.या स्पर्धा श्री देव आदिनारायण मंदिर येथील रंगमंचावर संपन्न होणार आहेत.अधिक माहीती व नावनोंदणीसाठी श्री प्रथमेश नाईक (९४२३०५१६८७,९४०५९७३६८७) यांच्याशी संपर्क साधावा.

अभिप्राय द्या..