You are currently viewing एसटीच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणस सुरू..

एसटीच्या कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणस सुरू..

कणकवली /-

आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र एस टी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समिती सिंधुदुर्गच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यात एस टी महामंडळाचे राज्यशासनात विलगिकरण व्हावे, राज्यसरकारच्या कर्मचाऱ्याप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता दिवाळी पूर्वी मिळाला पाहिजे, वाढीव घर भाडे ८, १६, २४ या दराने मिळाले पाहिजे, सर्व सण भत्ता १२,५०० मिळालाच पाहिजे, वार्षिक वेतन वाढ २ टक्के वरून ३ टक्के मिळावा, न्यायालयाच्या आदेशानुसार ठरलेल्या तारखेला पगार मिळालाच पाहिजे आणि दिवाळी बोनस १५ हजार ५०० रुपये मिळालाच पाहिजे अशा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले असून या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी विभागीय सचिव इंटक पांडुरंग गावडे, इंटक कणकवली आगार अध्यक्ष गौरेश लोकरे, कामगार संघटना विभागीय सचिव विनय राणे, कामगार संघटना विभागीय अध्यक्ष अनंत रावले, कामगारसेना महिलाअध्यक्ष मानसी परब, कायदेशीर सल्लागार प्रकाश साखरे, इंटक अध्यक्ष अशोक राणे, इंटक सचीव आबा धुरी, अविनाश दळवी, मधू भगत, संतोष चव्हाण, संजय सावंत, रमाकांत जाधव, कृष्णा कुडतरकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..