You are currently viewing बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात कोव्हिड १९ लसीकरणाचा प्रारंभ…

बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात कोव्हिड १९ लसीकरणाचा प्रारंभ…

वेंगुर्ला /-


बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य कोव्हिड १९ लसीकरण अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक नागेश गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर, प्राध्यापक डॉ.आनंद बांदेकर सुरेंद्र चव्हाण तसेच आरोग्य विभागाचे गोसावी,तांडेल आदी उपस्थित होते. सुमारे ७७ विद्यार्थी आणि स्टाफ यांचे लसीकरण पूर्ण झाले. लसीकरण पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

अभिप्राय द्या..