You are currently viewing आरवली ग्रामपंचायतीतर्फे<br>बेरोजगार,गरजू,होतकरू, युवक युवतीना मोफत व्यवसायिक प्रशिक्षण शुभारंभ.

आरवली ग्रामपंचायतीतर्फे
बेरोजगार,गरजू,होतकरू, युवक युवतीना मोफत व्यवसायिक प्रशिक्षण शुभारंभ.

वेंगुर्ला /-


१४ वा वित्तीय आयोग निधीतून आरवली ग्रामपंचायत चे सरपंच तातोबा कुडव व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून आरवली गावातील गरजू,होतकरू,बेरोजगार युवक,युवतीना मोफत व्यवसायिक प्रशिक्षण देण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे मंगळवार २६ ऑक्टोबर रोजी कोव्हिड १९ प्रादुर्भाव चे सर्व नियम पाळून आरवली गावातील इच्छुक गरजू,होतकरू,बेरोजगार युवक – युवतींची आरवली ग्रामपंचायत सभागृहात सभा घेण्यात आली होती. या वेळी मान्यवर म्हणून आरवली ग्रामपंचायत ग्रामविस्तार अधिकारी विनय धाकोरकर व ब्युटीपार्लर प्रशिक्षण संस्थेचे मान्यवर,सत्यम काॅम्प्युटर चे अविनाश शिरोडकर,ओम साई मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे प्रकाश गावडे यांनी सभेला मार्गदर्शन केले. या वेळी वरील उपस्थित मान्यवर व आरवली ग्रामपंचायत सदस्य समिर कांबळी यांच्या उपस्थितीत आरवली ग्रामपंचायत सरपंच यांनी वाहन चालक प्रशिक्षण,एमएससीआयटी व ब्युटी पार्लर या तीन प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ केला. यावेळी प्रशिक्षण घेणारे ८२ युवक,युवती उपस्थित होते. त्याच प्रमाणे आरवली ग्रामपंचायत उपसरपंच रिमा मेस्त्री,ग्रामपंचायत सदस्य सायली कुडव,शिला जाधव,वैशाली रेडकर,अक्षता नाईक,प्रवीण मेस्त्री,किरण पालयेकर,व ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचा समारोप आरवली ग्रामपंचायत सरपंच तातोबा कुडव यांनी केला.

अभिप्राय द्या..