You are currently viewing महसूलचा अवैध वाळू उत्खननावर बडगा चिंदर भगवंत गड तेरई परीसरातील आठ रँप तोडले..

महसूलचा अवैध वाळू उत्खननावर बडगा चिंदर भगवंत गड तेरई परीसरातील आठ रँप तोडले..

आचरा /-


कालावल खाडी पात्रात होणाऱ्या अवैध वाळू उत्खनना विरोधात सोमवारी सायंकाळी महसूल यंत्रणेने धडक कारवाई करत भगवंत गड येथील पाच आणि तेरई येथील तीन मिळून आठ रँप उद्ध्वस्त केले.

अवैध वाळू उत्खननाबाबत वाढत्या तक्रारी आणि वाहतूकीमुळे होणारी रस्त्यांची दुर्दशा यामुळे ग्रामस्थांमधून तक्रारी वाढल्या होत्या. वायंगणी येथे ग्रामस्थ आणि वाळू व्यावसायिकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन आचरा पोलीस स्टेशनला परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात झाले होते. यामुळे महसूलने जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाविरोधात धडक कारवाई सुरू केल्याचे चित्र दिसत असून सोमवारी आचरा
मंडल अधिकारी अजय परब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संरक्षणात कालावल खाडी पात्रातील आठ रँप जेसीबीने जमिन दोस्त करत धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत आचरा मंडल अधिकारी अजय परब,भटवाडी तलाठी माळी, चिंदर तलाठी जाधव,हडी तलाठी श्रीमती भोगटे,आचरा तलाठी अनिल काळे,कोतवाल गिरीश घाडी, पोलीस हवालदार मनोज पुजारे,
पोलीस पाटील दिनेश पाताडे आदी सहभागी झाले होते. सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या कारवाई मुळे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते.

अभिप्राय द्या..