You are currently viewing भारत माता की जय..हिंदू एकतेचा विजय असो..म्हणत बांगलादेशाचा वेंगुर्लेत निषेध !

भारत माता की जय..हिंदू एकतेचा विजय असो..म्हणत बांगलादेशाचा वेंगुर्लेत निषेध !

वेंगुर्ला /-

भारत माता की जय..हिंदू एकतेचा विजय असो… बांगलादेशाचा निषेध असो..अशा गगनभेदी घोषणा वेंगुर्लेत हिंदू संघटनांनी दिल्या. बांगलादेशात नवरात्रीमध्ये शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि ‘इस्कॉन’ मंदिरावर आक्रमण करणाऱ्या तसेच हिंदूवर सशस्त्र आक्रमणे करून हत्याकांडे घडवणाऱ्या धर्माधांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या हिंदू संघटनांनी एकत्र येऊन केली, आणि या बाबत एक निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यासाठी वेंगुर्ले चे नायब तहसीलदार लक्ष्मण फोवकांडे यांच्याकडे सादर केले.वेंगुर्ले तहसिल कार्यालयात संघटनांचे हिंदू बांधव एकत्र आल्यानंतर ॲड. सुषमा खानोलकर यांनी एकत्र येण्या मागची भूमिका मांडली. बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’ अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि शेकडो हिंदूंवर आक्रमण केले. या हिंसाचारात ४ हिंदूंना ठार मारण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.तसेच ‘हिंदु व्हॉईस’ वृत्त संकेतस्थळाने धर्माधांनी श्री दुर्गादेवीची मूर्ती नदीत फेकण्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.तसेच कॅमिला या भागातील ९ मंडपांवर आक्रमणे करून तेथील देवीच्या मूर्तीची तोडफोड केल्याची माहिती दिली आहे. येथे आक्रमणे अद्यापही चालू असून तणावाची स्थिती आहे. या परिसरातील हिंदू घाबरलेले असून पोलीस धर्मांधांना रोखण्यात अपयशी ठरले आहेत, असे म्हटले आहे. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्यांक असून त्यांच्यावर धर्मांधांकडून अत्याचार होत आहेत. तेथील शासनही हे रोखण्यात कमी पडत असून त्यांचीच त्यांना फुस आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे या धर्मांधांवर शासनाने कठोर कारवाई, अशी मागणी वेंगुर्ले तालुक्यातील हिंदूंनी या निवेदनाद्वारे केली आहे.तहसिलदार यांना निवेदन सादर करताना भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना ऊर्फ बाळू देसाई,
ॲड. सुषमा खानोलकर,
भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, हिंदू जनजागृती समितीचे गोपाळ जुवलेकर, वेंगुर्ले नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर, नगरसेवक नागेश गावडे,धर्मराज कांबळी, नगरसेविका श्रेया मयेकर, पंचायत समिती सदस्य स्मिता दामले,शिरोडा सरपंच मनोज उगवेकर,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आशिष पाडगावकर – विजय मोरजकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष प्रणव वायंगणकर, किसान मोर्चा अध्यक्ष प्रफुल्ल प्रभू, साईप्रसाद नाईक, रवी शिरसाट, नितीन चव्हाण, महिला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर – रसिका मटकर, श्रीकृष्ण धानजी, अनिल गावडे, ता.उपाध्यक्ष लक्ष्मीकांत कर्पे, संतोष शेटकर, विकास शेट्ये, साईप्रसाद भोई, दाजी नाईक, सौरभ नागोळकर,जगन्नाथ राणे, नितिष कुडतरकर, राजू राऊळ, सुनील घाग, प्रभाकर नेरूरकर, एकनाथ साळगावकर यांच्यासह हिंदू बांधव उपस्थित होते.

अभिप्राय द्या..