You are currently viewing मसुरे बांदिवडे पुलाच्या डाव्या बाजूला एका घरात पोलिसांच्या आशीर्वादाने जुगार सुरू..

मसुरे बांदिवडे पुलाच्या डाव्या बाजूला एका घरात पोलिसांच्या आशीर्वादाने जुगार सुरू..

मालवण /-

अंदर बाहर जुगार सर्वत्र बंद असताना मालवण व कणकवली येथे रात्री ८ ते ३ वाजेपर्यंत अंदर बाहर जुगार मोठ्या प्रमाणात चालत असून त्यामध्ये लाखोंची रुपयांची उलाढाल होत आहे.या जुगाराला स्थानिक राजकीय नेत्याचा वरदहस्त असल्याने पोलीस कारवाई करत नाही नाही असा तेथील ग्रामस्थांचा आरोप आहे.वेरली मसूरे येथील चाभाराचा चाळा फलका पासून शंभर मीटरच्या अंतरावर एका मांगर घरात हा जुगार चालत आहे.राजकीय पुढारी आणि पोलिसांच्या आशीर्वादाने हा झुगार सुरू असल्याचे दिसत आहे.पैशाच्या जोरावर आम्ही काहीही करू शकतो असे त्यांचे मत आहे.सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी याबाबत योग्य ती कारवाई करावी अशी मागणी
ग्रामस्थांनमधून होत आहे.

अभिप्राय द्या..