You are currently viewing कुडासे खुर्द येथे कायदे विषयक मार्गदशन शिबीर व चर्चा सत्र<br>जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची उपस्थिती

कुडासे खुर्द येथे कायदे विषयक मार्गदशन शिबीर व चर्चा सत्र
जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची उपस्थिती

दोडामार्ग


न्याय मागताना अनेक वेळा आर्थिक व योग्य सल्ला ही अडचण भेडसावते त्यामुळे सर्व सामान्य जनतेला कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा व तालुका प्राधिकरण सल्ला देण्याचे काम जिल्हा व तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून करत आहे यासाठी जिल्हा व तालुका न्यायालयाच्या माध्यमातून गावोगावी मार्गदशन शिबिर घेण्यात येत आहे यातून महिला व अन्य सर्व सामान्य जनतेने कायद्याची माहिती व आपल्या समस्या सोडवाव्यात यासाठी चर्चा सत्र फायदेशीर असल्याचे मत व्यक्त केले
कुडासे खुर्द ग्रामपंचयात (पाल पुनवर्सन) कार्यालयात आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही हांडे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव डी बी म्हालटकर दोडामार्ग दिवाणी न्यायाधीश वाय पी बावकर कुडासे खुर्द सरपंच संगिता सुहास देसाई दोडामार्ग वकील संघटना तालूका अध्यक्ष ऍड दाजी नाईक ऍड सोनू गवस ऍड प्रवीण नाईक ऍड भुवन कुबल ऍड शैलेंश धुरी आदी उपस्थित होते

दोडामार्ग तालुक्यातील सासोली मणेरी झरेबाबर साटेली भेडशी कुडासे खुर्द आदी गावात आज जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सिंधुदुर्ग यांच्या वतीने विविध ग्रामपंचयात कार्यालयात कायदे विषयक मार्गदशन शिबीर घेण्यात आले यामध्ये ऍड प्रवीण नाईक यांनी कायदा विषयक मार्गदशन केले त्यानंतर य जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एस व्ही हांडे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर बी रोटे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव डी बी म्हालटकर दोडामार्ग दिवाणी न्यायाधीश वाय पी बावकर आदींनी चर्चेत सहभाग घेत ग्रामस्थानी उपस्थित केलेल्या प्रश्नावर जमीन विषयक महिलांचे प्रश्न वरीष्ठ नागरिकांचे अधिकार बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार 2009 याबाबतीत मार्गदशन केले दिवाणी न्यायाधीश बावकर यांनी कार्यक्रमाबाबत प्रास्तविक करताना कार्यक्रम आयोजित करण्याचा उददेश व माहिती सविस्तर दिली त्यानंतर चर्चा सत्र घेऊन यामध्ये अनेक महिलांनी सहभाग घेत कायदे विषयक समस्या मांडल्या यावेळी मान्यवर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत चर्चा केली त्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले यावेळी आभार सरपंच संगिता देसाई यांनी मानले
या कार्यक्रमासाठी कुडासे खुर्द सरपंच सौ संगिता देसाई ग्रामपंचयात सदस्य संदेश देसाई सदस्या सौ सानवी दळवी सौ मयुरी पालव ग्रामसेविका ज्योती डोंगरदिवे जेष्ठ ग्रामस्थ अनासाहेब देसाई कृष्णा देसाई शांताराम सावंत माजी सैनिक अर्जुन राणे संजय सावंत भास्कर सावंत गिरीधर राणे प्रताप देसाई आशा सेविका ऋणाली देसाई अंगणवाडी सेविका वैष्णवी गवस
बचतगट सीआरपी सुचित्रा हरिजन कृषी सखी भाग्यश्री गवस
क्राती ग्रामसंघ सचिव प्रतीक्षा सावंत तसेच महिला बचत गटाच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते

अभिप्राय द्या..