You are currently viewing आमदार महोदय जरा सबुरीने घ्या;मुंबईला जाताना रत्नागिरी लागते;जि.नि.स. सदस्य बाबुराव धुरी यांचे प्रत्युत्तर..

आमदार महोदय जरा सबुरीने घ्या;मुंबईला जाताना रत्नागिरी लागते;जि.नि.स. सदस्य बाबुराव धुरी यांचे प्रत्युत्तर..

दोडामार्ग /-

पालकमंत्री उदय सामंत व बंधू यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांचे जोरदार खंडन करत, पालकमंत्र्यांना अडविण्याची भाषा सोडाच, पण मुंबईला जाताना वाटेत रत्नागिरी लागते हे ही लक्षात ठेवा असा जोरदार घणाघात आमदार नितेश राणे यांचेवर जिल्हा नियोजन समितीचे निमंत्रित सदस्य व शिवसेनेचे दोडामार्ग तालुकाप्रमुख बाबुराव धुरी चढवला आहे.
त्यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, आमदार राणे हे पदोपदी येणारे अपयश आणि शिवसेनेची दिवसेंदिवस होणारी सरशी यामुळे चलबिचल झाले आहेत. त्यामुळे नाहक आरोप करून शिवसेना नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी ते असले बेछूट आरोप करत आहेत. मात्र आम्ही असले आरोप खपवून घेणार नाही. पालकमंत्री उदय सामंत हे जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक कधी लावावी हा त्यांचा अधिकार आहे. तरीही आमदार राणे यांना जनतेची आणि विकास कामांची खरीच तळमळ असेल तर त्यांनी त्यांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषद ला जाब विचारावा. गतवर्षी जिल्हा नियोजन मधून दिलेल्या निधीचे काय झाले याचे उत्तर जिल्हा परिषदच देईल, असा टोला धुरी यांनी लगावला आहे. पालकमंत्री यांना रत्नागिरीला जाण्याची भाषा का वापरता, रत्नागिरी वरूनच मुंबईला जावे लागते, असे सुनावत सामंत बंधूवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा आपण काय करतो, त्याकडे लक्ष द्या. आपल्याकडे जर पुरावे होते तर आपण गप्प का? असाही सवाल धुरी यांनी उपस्थित केला आहे. आपले अपयश लपविण्यासाठी शिवसेना नेत्यांवर आता आरोप करणे बंद करा, असा सल्ला जिल्हा नियोजन समिती सदस्य बाबूराव धुरी यांनी आमदार राणे यांना दिला आहे.

अभिप्राय द्या..