You are currently viewing ओटवणे येथील महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्ब हाताळला हातातच झाला स्फोट..

ओटवणे येथील महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्ब हाताळला हातातच झाला स्फोट..

सावंतवाडी /-

ओटवणे येथील एका महिलेच्या हातात गावठी बॉम्ब फुटल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे.यात तिचे एक बोट तुटले असून हातालाही दुखापत झाली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान तिला प्राथमिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिस त्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

या महिलेने सुपारी समजून तो बॉम्ब हाताळला, असे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. दरम्यान या स्फोटात तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून एक बोट पुर्णतः निकामी झाले आहे. त्यामुळे तिला प्राथमिक उपचारासाठी नातेवाईकांनी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. तर या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी सावंतवाडी पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आहेत.

अभिप्राय द्या..