You are currently viewing एकटेपणाला कंटाळून आयनल रोहिलेवाडी येथील इसमाची गळफास लावून आत्महत्या..

एकटेपणाला कंटाळून आयनल रोहिलेवाडी येथील इसमाची गळफास लावून आत्महत्या..

कणकवली /-

आयनल रोहिलेवाडी येथील महेश रामचंद्र वायगंणकर (५२) यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना आज २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेस घडली आहे. एकटे पणाला कंटाळून घराच्या पडवीत लाकडी बाराला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. आत्महत्येनंतर त्यांच्या भावजयीला त्यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. तिने आपल्या पतीला सांगितले असता तातडीने पोलिसांना कळवण्यात आले.

महेश वायगंणकर यांचा मृतदेह पंचनामा करत शवविच्छेदन करून पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला. याबाबत भाऊ यशवंत कृष्णा वायगंणकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

अभिप्राय द्या..