You are currently viewing वायरीत गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर मालवण पोलिसांचा छापा पाच हजाराची दारू जप्त..

वायरीत गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर मालवण पोलिसांचा छापा पाच हजाराची दारू जप्त..

मालवण /-

मालवण वायरी येथे होत असलेल्या गोवा बनावटीची दारू विक्रीवर मालवण पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली. या छाप्यात ५ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली. पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

मालवण वायरी येथील मुस्लिम मोहल्ला येथे रोहन रजनीकांत पेंडूरकर (वय ३२) ही व्यक्ती गोवा बनावटीची दारू विकत असल्याची खबर मालवण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार काल रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी येथे छापा टाकत कारवाई केली. या छाप्यात गोवा बनावटीची सुमारे ५ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक एस. एस. ओटवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस भारत फारणे, सिद्धेश चिपकर, दिलीप खोत, संतोष टेंबुलकर यांच्या पथकाने केली.

अभिप्राय द्या..