You are currently viewing सोनाळी उपसरपंचपदी शिवसेनेच्या श्रेया कदम बिनविरोध..

सोनाळी उपसरपंचपदी शिवसेनेच्या श्रेया कदम बिनविरोध..

वैभववाडी /-

सोनाळी गावच्या उपसरपंच पदी शिवसेनेच्या श्रेया शिवदास कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सोनाळी सरपंच भीमराव भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सोनाळी ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी ग्रामसेवक तथा सचिव जी.डी.कोलते,ग्राम पंचायत सदस्य महेश सुतार,निकिता शेलार आदी उपास्थित होते.

कोरोना संसर्गाने सोनाळी गावचे उपसरपंच अशोक चव्हाण यांचे निधन झाले.त्यामुळे हे पद गेले अनेक महिने रिक्त होते.उपसरपंच निवड बुधवारी २० ऑक्टोबर रोजी आयोजित केली होती.ती बैठक तहकूब झाली.त्यामुळे गुरुवारी पुन्हा बैठक बोलविण्यात आली.या वेळी शिवसेनेचे चार सदस्य उपास्थित होते.त्यामुळे उपसरपंच निवड बिनविरोध करण्यात आली आली आहे.

शिवसेना पक्षाच्या उपसरपंच निवड झाल्यामुळे वैभववाडी तालुका शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे,शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके,तालुका संघटक अशोक रावराणे,माजी उपसभापती अंबाजी हुंबे,उपविभाग प्रमुख संतोष शेलार,संदीप शिंदे,नितीन शेलार,अनिल कदम,जयवंत पवार,अविनाश चव्हाण,विजय कदम,रमेश सुतार,पोलीस पाटील राजेंद्र रावराणे,हरिश्चंद्र गुरव,समीर कोदे,सचिन भोसले,राजू भोसले व ग्रामस्थ मोठया संख्येने उपास्थित होते.

अभिप्राय द्या..