You are currently viewing कणकवलीतील बेपत्ता तरुणाला मालवण पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात..

कणकवलीतील बेपत्ता तरुणाला मालवण पोलिसांनी दिले नातेवाईकांच्या ताब्यात..

मातवण /-

कणकवती ओटव येथून १६ ऑक्टोबरला बेपत्ता झालेता सुरज बडू मालप (वय २१) हा युवक गुरुवारी सकाळी मालवण चिवला बीच येथे सापडून आला. मालवण पोलिसांनी त्याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

मालवण पोलिसांच्या दामिनी पथकातील सुंदरी (सुप्रिया) पवार, विलास टेंबुलकर, दिलीप खोत आदी कर्मचारी गुरुवारी सकाळी शहरात गस्त घालत असताना कणकवली येथून बेपत्ता झालेला युवक चिवला बीच येथे फिरत असल्याची माहिती स्थानिकांकडून पोलिसांच्या दामिनी पथकाला मिळाली. कणकवली ओटव येथून बेपत्ता झालेल्या सुरज याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या आधारे खात्री करत पोलीस पथकाने घाबरलेल्या स्थितीत असलेल्या सुरज याला ताब्यात घेत पोलीस ठाणे येथे आणले. त्याला नाश्ता पाणी देत त्याची चौकशी केली. तसेच त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमधील नंबरच्या आधारे त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात आला. ओटव कणकवली येथील त्याच्या नातेवाईकांना याबाबत माहिती देण्यात आली.

त्यानंतर सुरज याचा भाऊ सुशील व ओटव सरपंच हेमंत परुळेकर गुरुवारी दुपारी मालवण पोलीस ठाण्यात पोहचले. मालवण पोलीस निरीक्षण एस एस ओटवणेकर व सहायक पोलिस निरीक्षक सचिन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधितांचे जवाब नोंद करत सुरज याला नातेवाईकांच्या ताब्यात दिले. कामाच्या शोधत आपण मालवणला आल्याचे सुरज यांने पोलिसांना सांगितले.

सुरज यांची मानसिक मधेच स्थिती ठीक नसते. त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. तसेच सुरज बेपत्ता झाला यावावत कणकवली पोलिसांना माहिती देण्यात आली होती. असे सरपंच हेमंत परुळेकर यांनी मालवण पोलिसांना माहिती देताना सांगितले. दरम्यान, वेपत्ता असलेला सुरज पुन्हा मिळाल्याने नातेवाईक व सरपंच यांनी मालवण पोलिसांचे आभार मानले आहेत.

अभिप्राय द्या..