You are currently viewing पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराज यांचा ११७ वा जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात झाला साजरा..

पिंगुळी येथील प.पू. राऊळ महाराज यांचा ११७ वा जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात झाला साजरा..

कुडाळ /-

पिंगुळी येथील प. पू. राऊळ महाराज यांचा ११७ वा जयंती उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला तसेच प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज यांच्या पादुकांचे पूजनही करण्यात आले.

पिंगळी येथील प. पू. राऊळ महाराज यांचा ११७ वा जयंती उत्सव सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला यामध्ये प. पू. राऊळ महाराज यांच्या मूर्तीला अभिषेक करून प. पू. विनायक अण्णा राऊळ महाराज यांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले तसेच समाधी स्थळी अभिषेक करण्यात आला या जयंती उत्सवानिमित्त भजन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले प. पू. राऊळ महाराज यांचा जन्मोत्सव यानिमित्ताने साजरा करण्यात आला यामध्ये ११७ सुहासिनींच्या हस्ते प पू. राऊळ महाराज यांचा पाळणा झोका करण्यात आला तसेच कोजागिरी पौर्णिमा सुद्धा यावेळी साजरी करण्यात आली या जयंती उत्सवाला मोठ्याप्रमाणावर भक्त दर्शनासाठी आले होते.

अभिप्राय द्या..