You are currently viewing लोरे नं. 2 च्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या शुभांगी कुडतरकर यांची बिनविरोध निवड..

लोरे नं. 2 च्या उपसरपंचपदी शिवसेनेच्या शुभांगी कुडतरकर यांची बिनविरोध निवड..

वैभववाडी /-

वैभववाडी तालुक्यातील लोरे नं. २ येथील तत्कालीन उपसरपंच दीपक पाचकूडे यांचे कोविड १९ ने निधन झाल्याने हे पद रिक्त होते. त्याची निवडणूक प्रकियेचा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार आज लोरे गावचे सरपंच विलास नावळे यांच्या अध्यक्षतेखाली हा निवडणूक कार्यक्रम पार पडला. यावेळी उपसरपंचपदी शिवसेनेच्या शुभांगी कुडतरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य मंगेश लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत लोरे जिल्हा परिषद सदस्या दिव्या पाचकूडे यांनी शुभांगी कुडतरकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रसंगी सरपंच विलास नावळे, शिवसेना तालुका कार्यकारणी सदस्य संभाजी रावराणे, माजी सरपंच नाना रावराणे, ग्रामपंचायत सदस्य विनोद पेडणेकर, रितेश सुतार, निकिता आग्रे, सुप्रिया रावराणे, संगिता कदम, ग्रामसेविका काळे मॅडम, आबा मांडवकर, आग्रे मामा आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..