कुडाळ /-

शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूर च्या १९८३/८४ सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक ऋण फेडण्याच्या जाणिवेतून पणदूर येथील संविता आश्रमातील निराधारांना धान्य, मसाला साहित्य आणि खाद्यपदार्थ यांचे मोफत वाटप केले. माजी विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या १६,०००/- रुपये वर्गणीतून वरील साहित्य खरेदी करून आश्रमातील निराधारांना दान करण्यात आले. यावेळी माजी विद्यार्थी संजय गोसावी, वर्षा परब, शुभदा बांबर्डेकर, पणदूरचे पोलिस पाटील देवू सावंत उपस्थित होते.

सदर उपक्रमासाठी वर्षा परब, सुनंदा सावंत, वंदना पवार, भास्कर नाटळकर, प्रताप पाटकर, जनार्दन सामंत, ताया पवार, नीला पटवर्धन, शुभदा बांबर्डेकर, अशोक पवार, शुभांगी जड्ये, सत्यवान तिवरेकर, हनुमंत पवार, शेवंती परब, शालिनी पालव, संजय गोसावी, विकास करावडे, सुखदा बांबर्डेकर, प्रकाश पालव या माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

सध्या संविता आश्रमात लहान ते ज्येष्ठ असे १४२ निराधार आहेत. या आश्रमासाठी संदिप परब यांचे योगदान फार मोठे आहे. आमच्या १९८३/८४ बॅचच्या वतीने संदीप परब यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे आणि यापुढेही सामाजिक उपक्रम राबवणे सुरू ठेवणार आहोत, अशी प्रतिक्रिया माजी विद्यार्थ्यांच्या वतीने संजय गोसावी यांनी यावेळी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

You cannot copy content of this page