You are currently viewing इंधन दर वाढीचा फटका जेसीबी व्यावसायिकांना आचरा येथील बैठकीत दरवाढीचा निर्णय..

इंधन दर वाढीचा फटका जेसीबी व्यावसायिकांना आचरा येथील बैठकीत दरवाढीचा निर्णय..

आचरा /-

इंधन दरवाढीचा फटका जेसीबी व्यावसायिकांना बसत असून यामुळे प्रती तास अकराशे रुपये करण्याचा निर्णय जेसीबी व्यावसायिकांच्या आचरा येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीला दुर्गाप्रसाद तुळपुळे, राजू परुळेकर, चंद्रकांत हडकर, विकास हडकर, भाऊ हडकर,अजय साटम, मिलिंद मिराशी, सुधीर माने , रुपेश गायतोंडे, महेश मोहिते, जयंत पांगे आदी उपस्थित होते. यावेळी डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे कामाचे तासाचा दर वाढविणे आवश्यक असल्याचे मत सर्वानुमते व्यक्त करण्यात आले. या बाबत चर्चे अंती जेसीबी प्रति तास अकराशे रुपये याप्रमाणे भाडे आकारावे असे ठरले, तसेच कामाचे ठिकाणी जाण्याचा व येण्याचा मोबदलाही आकारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला

अभिप्राय द्या..