You are currently viewing अवैध वाळू उत्खनन प्रकरणी तिन्ही संशयित आरोपींना १५ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी…

अवैध वाळू उत्खनन प्रकरणी तिन्ही संशयित आरोपींना १५ ऑक्टोंबर पर्यंत पोलिस कोठडी…

मालवण /-

काही दिवसांपूर्वी देवबाग येथे कर्ली खाडी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या बोटींवर करण्यात आलेल्या कारवाईमधील गुन्हा दाखल झालेले संशयित बोट मालक सागर रामचंद्र परब (वय २८, रा. बाव कुडाळ), लीलाधर जगदीश खोत (वय ३६, रा. चिपी वेंगुर्ले) व मुकेश नामदेव सारंग (वय ३६, रा. चिपी वेंगुर्ले) या तिघांचा जिल्हा न्यायालयाने जामीन नाकारल्याने काल मंगळवारी हे तिघेही मालवण पोलीस स्थानकात हजर झाल्यानंतर . पोलिसांनी त्यांना अटक केली दरम्यान, आज या संशयित तिघांनाही पोलिसांनी मालवण न्यायलयात हजर केले असता त्यांना १५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..