You are currently viewing साटेली वरचा बाजार येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे साजरा.

साटेली वरचा बाजार येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात होत आहे साजरा.

.

अनेक कार्यक्रमांचे आयोजन व शासनाच्या नियमांचे पालन करत नवरात्रोत्सव केला जातोय साजरा..

दोडामार्ग /-

गणेश चतुर्थी नंतर कोकणवासीयांसाठी नवरात्र हा सण मोठा मानला जातो नवरात्रीचे नऊ रंग साजरे करत प्रत्येक रंगाला एक वेगळा दर्जा देत हा सण साजरा केला जातो अशीही अनेक वर्षांची प्रथा या नवरात्र उत्सवात आपणास दिसून येते दोडामार्ग तालुक्यातील दुसरी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे गाव म्हणजे साटेली या गावात गेल्या काही वर्षांपासून नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो येथे भाविकांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते अनेक भक्तगणांचा यात समावेश असतो यामुळे साटेली नव्हे तर साटेली येथील इतरस्त लगतचे गाव देखील भक्तिमय वातावरणात दंग असतात,चालू असलेला काळ हा कोरोनाचा काळ असल्याने यावर्षी शासनाने घालून दिलेले सर्व नियमांचे नियमितपणे पालन करत नवरात्र उत्सव साटेली येथे साजरा करण्यात येत आहे, यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन देखील केले आहे साटेली येथील नवरात्र उत्सवा मुळे लगत असलेल्या इतरस्त गावांत मध्ये एकोप्याची भावना निर्माण होत असून साटेली व साटेली लगतच्या गावांचे देखील मैत्रीपूर्ण संबंध जुळलेले दिसतात.

दोडामार्ग मधील 75 टक्के लोक हे साटेली बाजार पेठ मध्ये येत असतात यामुळे जरी नवरात्र साटेली येथे साजरी केली असली तरी साटेली मधील इतरस्त गावांमधील लोकांना देखील साटेली येथील नवरात्र उत्सवाची लगबग लागून राहिलेली असते यामुळे साटेली व साटेली लगतच्या गावांसाठी हा सण खुप मोठा उत्साही ठरतो.

अभिप्राय द्या..