You are currently viewing रेडी येथील सापडलेला तो” मृतदेह शितल नाईक यांचा पोलिसांची माहिती..

रेडी येथील सापडलेला तो” मृतदेह शितल नाईक यांचा पोलिसांची माहिती..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले तालुक्यातील रेडी येथील नदीकिनारी रविवार १० ऑक्टोंबर रोजी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तो मृतदेह रेडी बोंबडोजीचीवाडी येथील शितल शिवाजी नाईक यांचा आहे. अशी माहिती वेंगुर्ले पोलिसांनी दिली. रेडी नदीत मच्छिमारी करत असताना येथील स्थानिकांना किनारी एक मृतदेह असल्याचे रविवारी दिसून आले. तात्काळ त्यांनी स्थानिक जि. प सदस्य प्रितेश राऊळ यांना कळऊन पोलिसाना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर घेतला. दरम्यान ही माहिती मिळताच पं. स. उपसभापती सिद्धेश परब, कौशिक परब यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. साधारण ४५ ते ५० वर्षाची ही महिला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र हा मृतदेह नेमका कोणाचा हे समजले नव्हते. मात्र सिध्देश परब यांनी आपल्या माहितीनुसार सदर महिला आरवली बांधवाडी येथील असल्याचे लक्षात आले. त्यांनी पोलिसांना सोबत घेऊन बांधवाडी येथे जाऊन त्या महीले बाबत चौकशी केली असता, ती रेडी येथील असल्याचे समजले. बांधवाडी येथील केशव पेडणेकर यांनी सदर महिलेची पाहणी करून ती आपली बहीण असल्याचे सांगितले. मात्र तिच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. पती च्या निधनानंतर त्या एकट्याच राहत होत्या. दरम्यान ओळख पटल्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन करून पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. यावेळी पोलीस हेडकॉन्स्टेबल दळवी, महिला पोलिस दळवी, नाईक यांनी दिली.अशी माहिती पोलिसांनी दिली.

अभिप्राय द्या..