You are currently viewing वैभववाडीत लखिमपूर घटनेचा वैभववाडीत महाविकास आघाडीने केला निषेध..

वैभववाडीत लखिमपूर घटनेचा वैभववाडीत महाविकास आघाडीने केला निषेध..

वैभववाडी /-

भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या केंद्र सरकारमधील मंत्र्यांच्या मुलाने उत्तरप्रदेश मधील शेतकऱ्यांच्या चाललेल्या आंदोलनात निर्दयपणे गाडी चालवली व शेतकऱ्यांना चिरडले. स्वतः च्या न्यायहक्कासाठी केंद्र सरकार तसेच उत्तरप्रदेशच्या राज्य सरकार विरोधात आंदोलन करून घरी परतत असताना आपल्या सरकार विरोधात आंदोलन केल्याचा राग ठेवून या सर्वसामान्य गरीब शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालण्यापर्यंत बीजेपीच्या लोकांची मजल गेली आहे. इतकं निर्दयी सरकार आम्ही आजवर पाहिलेले नाही. या सर्व कृत्याला कारणीभूत असलेल्या त्या निर्दयी मंत्री पुत्राला कठोर शासन व्हावे, यासाठी महाराष्ट्र बंद पुकारण्याबाबतचे आवाहन आम्ही महाविकास आघाडी सरकारच्या वतीने करत आहोत, या आशयाचे निवेदन महाविकास आघाडी वैभववाडी तालुकामार्फत तहसीलदार रामदास झळके यांना देण्यात आले.

यावेळी नंदू शिंदे उपजिल्हा प्रमुख शिवसेना सिंधुदुर्ग, मंगेश लोके तालुका प्रमुख शिवसेना वैभववाडी, दादामिया पाटणकर अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडी, वसंत नाटेकर उपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस वैभववाडी, रवींद्र चव्हाण अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वैभववाडी तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..