You are currently viewing लखीमपूर शेतकरी नरसंहाराचा कणकवली राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध !

लखीमपूर शेतकरी नरसंहाराचा कणकवली राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध !

कणकवली /-

उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथील शेतकरी नरसंहार मधील आरोपी असलेल्या मोदी मंत्रिमंडळातील मंत्रीपुत्र अजय मिश्राला मोदी सरकार पाठीशी घालत आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाहीचा कणकवली राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांनी निषेध करत तहसीलदार रमेश पवार यांना निवेदन दिले.

शेतकऱ्यांवर गाडी चालवून त्यांचा खून करणाऱ्या मंत्रिपुत्र अजय मिश्रा याला भाजपाचे केंद्र सरकार पाठीशी घालत आहे. भाजपाच्या केंद्र सरकारच्या हुकूमशाहीचा महाविकास आघाडी निषेध करत आहे. हिटलरशाही केंद्र सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नसून मोदी सरकारने राजीनामा देऊन सत्तेतून पायउतार व्हावे. शेतकरी आणि सिंधुदुर्गवासीयांच्या वतीने केंद्र सरकार बरखास्त करण्याची मागणी करत असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस कणकवली तालुकाध्यक्ष राजू पावसकर यांनी तहसीलदार रमेश पवार यांना दिले. यावेळी माजी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे, डॉ. अभिनंदन मालंडकर, सुधा कर्ले, पारकर गुरुजी, सुधाकर ढेकणे, युवक अध्यक्ष सागर वारंग, सिध्देश बागवे, संतोष टक्के, प्रवीण वरुणकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..