You are currently viewing श्री.केपादेवी वारकरी भजन मंडळ उभादांडा तर्फे कोरोना योद्धा श्री. कार्मीस आल्मेडा यांचा जाहीर सत्कार…

श्री.केपादेवी वारकरी भजन मंडळ उभादांडा तर्फे कोरोना योद्धा श्री. कार्मीस आल्मेडा यांचा जाहीर सत्कार…

वेंगुर्ला /-

केपादेवी मंडळ उभादांडा वेंगुर्ला यांच्या वतीने दि. 9,व 10 ऑक्टोबर 2021 रोजी भव्य वारकरी जिल्हा स्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात जिल्यातील वारकरी भजन मंडळ सहभागी झाले होते. तसेच या दोन दिवसात आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. उभादांडा गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. कार्मीस आल्मेडा यांना कोरोना योद्धा म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कोरोना काळात गावात वेंगुर्ला नव्हे तर् जिल्ह्यात देखील खूप जणांचे जीव वाचविण्यात आल्मेडा यांचे मोठं योगदान आहे अश्या चांगल्या व्यक्तीचा सन्मान केलात त्या बद्दल मंडळाचे मी आभार मानतो असे गौरवउदगार या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत कलावंत प्रसिद्ध समालोचक श्री. राजा सामंत यांनी काढले या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

अभिप्राय द्या..