सावंतवाडी /-

“लुपिन फाउंडेशन डे” च्या निम्मीताने लुपिन फाउंडेशन कडून आरोग्य सेवा सप्ताह आयोजित केला होता.या सप्ताहात जिल्ह्यात ठिकठिकाणी आयोजित केलेल्या आरोग्य सेवा व शिबिरांना जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरोग्य सेवा देशभरात पोचवण्याची संकल्पना आणि मार्गदर्शन लुपिन फाउंडेशनच्या सीईओ तुषारा शंकरा यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली.याच संकल्पनेनुसार सिंधुदूर्ग जिल्ह्यात लुपिन फाउंडेशनकडून 1 ते 7 ऑक्टोंबर हा सप्ताह आरोग्य सप्ताह म्हणुन साजरा करण्यात आला.या आरोग्य सप्ताह निमित्ताने जिल्ह्यात एकूण नऊ ठिकाणी आरोग्य शिबिरे घेण्यात आली. जिल्हा आरोग्य यंत्रणा,सिंधुदुर्ग,वालावलकर ट्रस्ट, डेरवण, चिपळूण,आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय सावंतवाडी,डॉ चुबे,कुडाळ व ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे यांचे विशेष सहकार्य लाभले.

आरोग्य शिबिरामध्ये जनरल तपासणी, स्त्री रोग तपासणी,नेत्र तपासणी, अस्थि रोग तपासणी, दिव्यांग व गरोदर माता याना लसीकरण, रूग्णांची हिमोग्लोबीन तपासणी, ब्लड प्रेशर तपासणी, बाल रोग तपासणीकरिता शिबीर, पोषण आहार विषयी जनजागृती,आरोग्य विषयी शासकीय योजनाची माहीती व जनजागृती, कोवीड योद्धा सन्मान अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला होता.आरोग्य सप्ताह निमित्ताने उप जिल्हा रुग्णालय,शिरोडा,प्राथमिक आरोग्य केंद्र,रेडी,उप जिल्हा रुग्णालय,कणकवली, बाल रोग शिबीर,कुडाळ,प्राथमिक आरोग्य केंद्र,नांदगाव,दिविजा आश्रम असलदे,कणकवली मांगवली,वैभववाडी; प्राथमिक आरोग्य केंद्र,निरवडे अंतर्गत ग्रामपंचायत तळवडे, प्राथमिक आरोग्य केंद्र,मळेवाड अशाप्रकारे 9 ठिकाणी आरोग्य शिबीर घेण्यात आली असून या शिबिराचा 665 लोकांनी लाभ घेतला.कोवीड महामारी च्या काळात आरोग्य विषयक सेवा पुरविणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी,चतुर्थ श्रेणी कर्मचारी,आशाताई अशा एकूण 200 जणांचा कोवीड योद्धा म्हणून प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

आरोग्य शिबिरे संपन्न करण्यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालयात व रुग्णालय सावंतवाडी मधील तज्ञ डॉ चोडनकर ,डॉ विशाल पाटील ,डॉ लेले डॉ मसुरकर,डॉ ठाकरे व इतर तज्ञ ,डॉ चुबे कुडाळ बालरोग तज्ञ त्याच बरोबर वालावलकर हॉस्पिटल, डेरवण मधील डॉ. मुळये, डॉ. कांचन,डॉ. ऋषभ,डॉ. पियूष गायकवाड, डॉ काळे, डॉ अमित पाटील, डॉ मोनिका जोशी, डॉ धुमाळ,नर्सेस भाग्यश्री आसगावकर, योगिता खानोलकर, नर्स ऐश्वर्या, नर्स सुप्रिया यांचे सहकार्य लाभले.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी व उप जिल्हा रुग्णालय शिरोडा मधील आरोग्य कर्मचारी,चतुर्थ श्रेणी कर्मचारी आदि मार्फत आरोग्य तपासणी व लसीकरण करण्यात आले.लुपिन फाउंडेशन चे प्रकल्प अधिकारी नारायण परब, संतोष कुडतरकर, चंद्रकांत म्हापणकर, नारायण कोरगावकर, उमेद अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ चे कर्मचारी उपस्थित होते. सदर शिबिरे लुपिन फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page