ओरोस /-

कणकवली कडून कुडाळ पिंगुळी कडे जाणारी आय 20 गाडी नं. MH 07 Q 7181 ही गाडी ओरोस येथील भवानी मंदीर समोरच्या पुलावर आल्यानंतर अपघातग्रस्त झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.सुदैवाने चालक गणपत दळवी रा. पिंगुळी यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांनाओरोस येथील सरकारी दवाखाण्यात पुढील उपचारासाठी पाठवले आहे.

गणपत दळवी हे कणकवली येथे कोकण रेल्वेत नोकरीला असून अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ते आपली ड्युटी संपवून राहत्याघरी पिंगूळीला जात होते. मात्र ओरोस येथे भवानी मंदीरा जवळ आल्यावर त्यांचा डोळा लागला असावा असे प्रत्यक्ष दर्शनी पाहणाऱ्यांनी सांगीतले.

या अपघाताची इतकी तिव्रता होती की रस्त्याच्या कडेला संरक्षणासाठी लावलेले लोखंडी रोलींगला सदरची आय ट्वेंटी ही गाडी अदांजे 25 ते 30 फूट घासत जाऊन पथ दिप च्या खांबावर आदळल्याने तो खांबच पुर्णपणे महामार्गावर आडवा झाला आणि गाडी उजवीकडे फिरून रस्त्याच्या मध्यभागी येवून बंद पडली. गाडीच्या दर्शनी भागाचा पुर्णपणे चक्काचूर झाला असून ड्रायव्हर बाजूचा दरवाजा आत चेपल्याने ग्रामस्थानी धावत जाऊन ड्रायव्हरला विरूद्ध दरवाजातून बाहेर काढले .सुदैवाने ड्रायव्हर गणपत दळवी रा. पिंगूळी वय 45 वर्षे हे सिटबेल्ट घातल्यामूळे व एअरबॅग वेळीच उघडल्यामुळे नशीब बलवत्तर म्हणून वाचले.मात्र त्यांच्या उजव्या हाताला स्टेअरिंगचा मार लागल्याने किरकोळ जखम झाली आहे.या घटनेची माहिती मिळताच ए.पी.आय.हलवळे,ए.एस.आय.नळकांडे आर.एफ्.,महामार्ग पोलीस आर. पी.बूचडे व व्ही.एस्.देसाई.घटनास्थळी पोहचले असून अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page