You are currently viewing भविष्यात शिवसेना आमदारांचे डिपॉझिट जप्त करणार.;माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या ईशारा..

भविष्यात शिवसेना आमदारांचे डिपॉझिट जप्त करणार.;माजी खासदार डॉ.निलेश राणे यांच्या ईशारा..

कणकवली /-

मी दिला तर झटकाच देतो. आजचा हा झटका लहान आहे.याच्याहून मोठे झटके देणे बाकी आहे.पिक्चर अजून बाकी आहे.अजून आम्ही इंटरवलपर्यत आलो नाही ही तर सुरवात आहे.अजूनही अनेक शिवसैनिक आणि पदाधिकारी भाजपात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेत एवढी खदखद आहे, अंडर करंड सुरू आहे की येत्या काळात कुडाळमधील शिवसेनेच्या आमदाराचे डिपाॅझिटही राहणार नाही. असा इशारा भाजपा नेते आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांनी दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेला झटका दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी खासदार आणि भजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे म्हणाले, शिवसेनेत असंतोष खदखदतोय, स्थानिक आमदाराच्या विरोधात त्यांच्याच पक्षात बंडाळी उठली आहे.तुमचा पक्षाचा नेता,मुख्यमंत्री येवून गेला मात्र आज आम्ही करून दाखवले. अजून धक्के देत राहू .असा इशाराही खासदार निलेश राणे यांनी यावेळी दिला. भाजपा पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांना आश्वाशीत करतांना तुम्हाला आम्ही कुटुंबासारखे जपू कोणताही भेदभाव करणार नाही.तुम्हाला अपेक्षित असलेली जनतेची कामे आम्ही करू देऊ.असे आश्वासन यावेळी भाजपा नेते निलेश राणे यांनी दिले.

अभिप्राय द्या..