You are currently viewing वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ यांच्या वतीने दि.१४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन..

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ यांच्या वतीने दि.१४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन..

वैभववाडी /-

वैभववाडी तालुका बौद्ध सेवा संघ व माता रमाई महिला मंडळ शाखा ग्रामीणच्या वतीने गुरुवार दिनांक १४ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी ‘वैभवपर्व’ या त्रैमासिक डिजिटल अंकाचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक व सांस्कृतिक भवन या ठिकाणी याप्रसंगी बुद्ध पूजा पाठ व धम्मदीक्षा कार्यक्रम पार पडणार आहेत. तरी कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन कार्यक्रमास बौध्द बांधव व तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे सरचिटणीस रवींद्र पवार, कार्याध्यक्ष सुभाष कांबळे यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..