कणकवली /-

सिंधुदुर्ग जिल्हा बँके ही शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत असून ती शेतकऱ्यांची बँक आहे त्यामुळे शेतकर्‍यांचा बँकेत येणाऱ्या पैशाचे नियोजन हे योग्य रित्या व्हायला हवे. यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आतापर्यंत खूप उत्तम प्रकारे बँक चालवली आहे. तसेच जिल्हा बँकेचा रिमोट हा शेतक-यांच्या हाती असला पाहीजे व शेतक-यांच नेतृत्व यापुढेही सतिश सावंतांच्या रूपाने जिल्हा बँकेला लाभायला हवे असे सांगत सतीश सावंत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व पुढील काळात जिल्हा बँक नक्कीच प्रगती करेल असे प्रतिपादन माजी आमदार प्रमोद जठार यांनी कासार्डे येथे केले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक एटीएम सुविधा कासार्डे येथे उपलब्ध नसल्याने व शाखेच्या परिसरात इतर बँकांची एटीएम नसल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँक च्या वतीने ग्राहकांना एटीएम सुविधा मिळण्यासाठी ह्यूमन एटिएम सेवेचा शुभारंभ माझी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, बँक संचालक अतुल काळसेकर, संचालक रामचंद्र मर्गज, मुख्याधिकारी अनिरुद्ध देसाई, प्रभाकर सावंतबाळाराम तानवडे – सरपंच कासार्डे, साक्षी सुर्वे – सरपंच तरळे, श्रीपत पाताडे – अध्यक्ष, कासार्डे विकास से.सो.लि., विनायक राणे – अध्यक्ष, तरळे विकास से. सो. आदि मान्यवर व बँकेचे ग्राहक व ग्रामस्थमोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उद्घाटन प्रसंगी माजी आमदार प्रमोद जठार यांनी बोलताना सांगितले की जिल्हा बँके ही शेतकऱ्यांच्या हिताचे काम करत असून शेतकऱ्यांची बँक आहे त्यामुळे शेतकर्‍यांचा बँकेत येणाऱ्या पैशाचे नियोजन हे योग्य रिता व्हायला हवे यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आतापर्यंत खूप उत्तम प्रकारे बँक चालवली आहे व पुढेही त्यांचं नेतृत्व जिल्हा बँकेला लाभायला हवे असे सांगत सतीश सावंत यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व पुढील काळात जिल्हा बँक नक्कीच प्रगती करेल असे सांगितले.

यावेळी यावेळी सतीश सावंत यांनी देखील बोलताना सांगितले की, प्रमोद जठार हे सर्वांसाठी लकी आहेत आज आम्ही उद्धटनाला बोलावल्यावर त्यानी येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. ते आमच्यासाठी लकी आहेत त्यांनी जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपण राजकारण बाजूला ठेवून दोन पाऊले मागे घेण्यास तयार आहोत राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण काम करूया तरच जिल्ह्याची प्रगती होईल. असेही सावंत यांनी सांगत शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा बँक नेहमीच पुढे आलेली आहे. भविष्यातही शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून बँक मदत करत राहील आज या एटीएमचा शुभारंभ प्रसंगी सर्व नागरिकांनी या ह्यूमन एटिएम सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page