सिंधुदुर्ग /-

चिपी विमानतळाचं उद्घाटन माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण आहे आजचा. अशा क्षणी कोणतंही राजकारण करु नये असं मला वाटत होतं. आपण जावं शुभेच्छा द्याव्यात, सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरुन विमानाचं उड्डाण डोळे भरुन पहावं असं वाटत होतं, या स्तुत्य हेतूने मी इथे आलो.  मुख्यमंत्री राणेंच्या कानाजवळ काय म्हणाले?  नारायण राणेंनी पुढे म्हटलं, “मी इथे आल्यावर तीन-तीन विमाने पाहिले मला फार आनंद झाला आणि तसेच मी मंचाजवळ निघालो. मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री साहेब भेटले… काही तरी माझ्या कानाजवळ बोलले मी एक शब्द ऐकला. असो…” बांधवांनो विमानतळ होणं आवश्यक आहे. देशातील पर्यटक सिंधुदर्गात यावेत. पर्यटनाच्या माध्यमातून 4-5 दिवस रहावेत, सिंधुदुर्गातील व्यावसायिकांना याचा फायदा व्हावा आणि आर्थिक समृद्धी या जिल्ह्यातील लोकांना यावी या स्तुत्य हेतूने विमानतळ व्हावं असं मला वाटत होतं असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे. माझा स्वार्थ काही नव्हता – नारायण राणे 1990 साली बाळासाहेब ठाकरेंनी मला सिंधुदुर्गात पाठवलं. मी आलो निवडणूक लढवली आणि निवडून आलो. कणकवलीतील मोजकीच गावी मला माहिती होती. मी सिंधुदुर्गातील सर्व माहिती घेतली. पिण्यासाठी नागरिकांना पाणी नव्हतं. या जिल्ह्यात रस्ते नव्हते. वीज नव्हती. शैक्षणिक अवस्थाही चांगली नव्हती. इथले नागरिक नोकरीसाठी बाहेरच्या शहरात जात होते. मुंबईवर अवलंबून असलेला हा जिल्हा… येथे मी आल्यावर ठरवलं या जिल्ह्याचा विकास करायचा. मी फक्त सांगतोय, लोकांनी ठरवायचं की विकास कुणी केला. उद्धवजी हे सर्व बाळासाहेबांच्या प्रेरणेतून मी आत्मसात केलं आणि त्याची अंमलबजावणी करत होते. यात माझा स्वार्थ काही नाही. माननीय उद्धवजी एक विनंती आहे, मी आणि प्रभू याच जागेवरुन 15 ऑगस्ट 2009 रोजी भूमीपूजन करण्यासाठी आलो. त्याचवेळी समोरच्या बाजूने आंदोलन होत होते. विमानतळ होऊ देणार नाही. जमीन घेऊ देणार नाही, आम्हाल विमानतळ नको. नुसतं विमानतळापूरतं नाही तर रेडी बंदर सुद्धा. किती विरोध-किती विरोध? कोण करतंय विचारा? मी नावे घेतली तर राजकारण होईल. महिन्याला कोण जाऊन उभं राहतं आणि कामं आडवतं? कोण आडवत होतं विचारा जरा. असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page