You are currently viewing बॅ.नाथ पै येथे एकदिवशीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन..

बॅ.नाथ पै येथे एकदिवशीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन..

कुडाळ /-

थोर संसदपटू बॅ.नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष व स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष यांचे औचित्य साधून बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित बॅ. नाथ पै नर्सिंग व फिजिओथेरपी महाविद्यालय यांच्यावतीने व सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवासी संकुल रहिवासी संघ, सिंधुदुर्गनगरी यांच्या सहकार्याने जनसेवेसाठी रविवार दि. १० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्हा परिषद कॉलनी, ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे एकदिवशीय मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . या शिबिराचा उद्घाटन सोहळा मान. सौ. संजना सावंत, अध्यक्षा जिल्हा परीषद सिंधुदुर्ग यांच्या शुभहस्ते होणार आहे.

तरी या आरोग्य शिबीरात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन आरोग्य विषयक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या कल्पना भंडारी तसेच बॅ. नाथ पै फिजिओथेरपी महाविद्यालयाचे प्राभारी प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..