माझे कुटुंब,माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत रेडी गावात तपासणी..

माझे कुटुंब,माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत रेडी गावात तपासणी..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला महाराष्ट्र शासनच्या ‘ माझे कुटुंब* *माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत आरोग्यवर्धिनी रुग्णालय रेडी येथील आरोग्य विभागातर्फे रेडी येथे घरोघरी जाऊन तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.शुक्ला,सुपरवायझर कलंगुटकर, पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी रेडी परिसरात घरोघरी जाऊन तपासणी करुन या उपक्रमा अंतर्गत घरोघरी पोहोचवण्यासाठी मेहनत घेत आहेत.सर्व लोकप्रतिनिधी,समाजसेवक यांनी “माझे कुटुंब,माझी जबाबदारी” या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन रेडी जि.प.सदस्य व माजी आरोग्य,शिक्षण,सभापती प्रितेश राऊळ यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..