नेहरू युवा केंद्राच्या वतीने शासकीय कार्यालय,पोलीस मैदानाची साफसफाई..

नेहरू युवा केंद्राच्या वतीने शासकीय कार्यालय,पोलीस मैदानाची साफसफाई..

सिंधुदुर्गनगरी /-

आझादी का अमृत महोत्सव-इंडिया@७५” साजरा करण्याचा भाग म्हणून नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस मैदान व जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय इमारतींच्या आजूबाजूच्या परिसराची साफसफाई करण्यात आली. शिवाय नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्गतर्फे जिल्हावासियांना स्वच्छता बाळगण्याचे व ३१ ऑक्टोबर पर्यंत स्वछता अभियानात भाग घेण्याचे आवाहन केले. 

या कार्यक्रमात केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी मोहित सैनी, केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक अपेक्षा मांजरेकर, सुदर्शन खांडाळे, तुषार परब, गौरव नागझरकर, सहदेव पाटकर व केंद्राचे स्वयंसेवक व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

स्वच्छता ही फक्त आपल्या घर किंवा रस्त्यापुर्ती आवश्यक नसून, ही देशपातळीवर होणे अत्यावश्यक आहे. ज्यामुळे फक्त आपले घरच नव्हे तर संपूर्ण देश स्वछ होईल. याच उद्देशाला शिरोधार्त ठेऊन, भारत सरकार द्वारे देशातील प्रत्येक गावात व शहरांत हे अभियान सुरु केले आहे. ज्यामध्ये देशातील प्रत्येक वस्तीत, घरात तसेच प्रत्येक चौकात शौचालय बनवण्यापासून, ओल्या-सुख्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करत ; मनाच्या शुद्धीसाठी प्रयत्न करण्यापर्यंत या अभियानाचे उद्दिष्ट आहे.  

स्वच्छतेमध्ये रस्ते साफ करणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, शौचालयांची स्वच्छता व निरोगी वातावरण यासाठी हाती झाडू घेणे हा स्वच्छ भारत अभियानाचा भागच बनला आहे. लोकांनी ही चळवळ पुढे नेत “ईश्वराचे दुसरे रुप म्हणजे स्वच्छता” हया संदेशाच्या प्रसारात मदत करणे गरजेचे आहे. असे नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी मोहित सैनी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवाय त्यांनी, जनतेच्या सहभागामुळेच स्वच्छ भारत अभियानाचे रुपांतर एका राष्ट्रीय चळवळीत होऊ शकते, असे सांगितले. तसेच या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होणे अपेक्षित आहे. लोकांच्या सक्रीय सहभागामुळेच महात्मा गांधींचे स्वच्छ भारत हे स्वप्न लवकरच आकार घेण्याच्या मार्गावर आहे. असा आशावादही सैनी यांनी व्यक्त केला.

अभिप्राय द्या..