कुडाळ /

चिपी-परुळे येथे उभारण्यात आलेला “सिंधुदुर्ग विमानतळ” नऊ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उद्घाटनासाठी सज्ज झाला आहे. गेले दोन दिवस गोवा ते सिंधुदुर्ग आणि मुंबई ते सिंधुदुर्ग या दरम्यान खास विमानाने यशस्वी चाचणीही घेण्यात आली. विमानतळावर विमानात इंधन भरण्याची सुविधा तसेच अग्निशमन यंत्रणा दोन वाहनांसह कार्यान्वित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग विमानतळाचे लोकार्पण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपले असून सिंधुदुर्गवासियांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सोहळ्याचा आनंद सिंधुदुर्गवासियांना घेता येणार नाही, याची खंत व्यक्त करण्यात येत आहे. एअर इंडियाने हवाई सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केली असून आय. आर. बी. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. ने विमानतळावर आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

नागरी विमान वाहतूक मंत्रालय भारत सरकार, महाराष्ट्र शासनाचे उपस्थितीत चिपी विमानतळावर आयोजित करण्यात आला आहे. मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) असे रोज एक सत्तर आसनी विमान परतीचा करणार आहे. प्रवास पहिल्या टप्प्यात एअर इंडिया ही सेवा देणार आहे. आय. आर. बी. ने विमान वाहतूक सुरू करण्यासाठी सर्व सज्जता केली आहे, असे प्रकल्प संचालक राजेश लोणकर यांनी सांगितले.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ च आय. आर. बी. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजनेंतर्गत ग्रीनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महत्वाच्या ठरणाऱ्या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा नऊ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय लघु- सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मंत्री, खासदार, आमदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page