You are currently viewing उद्द्या ९ ऑक्टोबर पासून सुरू होणार ‘राष्ट्रीय डाक सप्ताह..’जागतिक टपाल दिन’ साजरा करून होणार सप्ताहाची सुरुवात..

उद्द्या ९ ऑक्टोबर पासून सुरू होणार ‘राष्ट्रीय डाक सप्ताह..’जागतिक टपाल दिन’ साजरा करून होणार सप्ताहाची सुरुवात..

सिंधुदुर्ग /-

भारतीय डाक विभागातर्फे ९ ऑक्टोबरपासून ‘राष्ट्रीय डाक साप्ताह’ साजरा केला जात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या अनुषंगाने यावर्षी राष्ट्रीय डाक सप्ताहाअंतर्गत “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” साजरा केला जात आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग डाक विभागात ९ ऑक्टोबर २०२१ रोजी “जागतिक टपाल दिन साजरा करून या सप्ताहाची सुरुवात केली जाणार आहे. १६ ऑक्टोबर पर्यंत हा सप्ताह चालणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे डाकघर अधीक्षक आ ब कोड्डा यांनी दिली.

सिंधुदुर्गनगरी येथील कार्यालयातील आपल्या दालनात अधीक्षक कोड्डा यांनी याबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी सहाय्यक अधीक्षक व्ही एन कुलकर्णी, विकास अधिकारी बालाजी मुंडे उपस्थित होते. पुढे बोलताना कोड्डा यांनी, दरवर्षी भारतीय डाक विभागामार्फत राष्ट्रीय डाक सप्ताह अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. या सप्ताहाच्या अनुषंगाने डाक विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या कल्याणकारी तसेच बचत योजनांची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी वेगवेगळे दिवस साजरे करून या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार डाक विभागातर्फे केला जातो, असे सांगितले.

अभिप्राय द्या..