You are currently viewing वेंगुर्लेत जोरदार पावसामुळे शेतकरी राजा चिंताग्रस्त

वेंगुर्लेत जोरदार पावसामुळे शेतकरी राजा चिंताग्रस्त


वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यात आज सकाळी १२.४ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.६ ऑक्टोबर पर्यंत एकूण २८८५.८० मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान परतीच्या या पावसाने तालुक्यात ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी परिपकव झालेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.तसेच आगामी पंधरवडा कालावधीत परिपकव होणाऱ्या भातपिकाचे नुकसान होणार आहे.त्यामुळे शेतकरी राजा चिंताग्रस्त आहे.शासनाने शेतकऱ्यांना योग्य कालावधीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्नशील असणे,शेतकऱ्यांच्या दृष्टीने हितावह आहे.

अभिप्राय द्या..