कुडाळ /-

नर्सिंग क्षेत्रात जबाबदार व्यक्ती म्हणून कार्यकरा रुग्णालयात रुग्णसेवा करत असताना रुग्णांकडून मिळालेले आशिर्वाद हिच आपली ठेव आहे, असं मानून कर्तव्य बजावत राहा असे आवाहन. बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयातील आयोजित कार्यक्रमात नानावटी रुग्णालयाच्या सहाय्यक परिचारिका अधीक्षक सौ. शलाका सावंत-परब यांनी केले.

महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून कुडाळ येथील बॅ. नाथ पै महाविद्यालयात नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थिनींनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला त्या विद्यार्थिनींना कोरोना ह्योद्धा म्हणून प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह मान्यवरांचा हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमात व्यासपीठावर मुंबई येथील नानावटी रूग्णालयाच्या सहाय्यक परिचारिका अधीक्षक सौ. शलाका सावंत-परब, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश उमेश गाळवणकर, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मीना जोशी, उपप्राचार्या सौ. कल्पना भंडारी, प्रा. कु. रेश्मा कोचरेकर, कु . पूजा म्हालटकर , पल्लवी हरकुलकर, प्रियांका माळकर, सौ ज्योती साकिन, सौ. वैशाली ओटवणेकर, कु. वैजयंती नार, प्रणाली मयेकर, ,प्रथमेश हरमलकर, फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉ. सुरज शुक्ला, कला वाणिज्य ,विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य अरुण मर्गज हे उपस्थित होते.

सौ. शलाका परब आपल्या पुढील मनोगतात म्हणाल्या की, “सेवेसारखे पुण्य कर्म नाही. मानवी सेवेतून मिळणाऱ्या समाधानाची तुलना कुठेही करता येत नाही. सेवेद्वारे एखाद्याला जीवदान देण्यामध्ये आपला सहभाग असण्यासारखा आनंद नाही आणि तो कर्तव्यपूर्तीद्वारे मिळत असेल तर यासारखे समाधान नाही. तुमच्या नशिबाने मानवी सेवा करण्याच्या पेशामध्ये तुम्ही प्रवेश केला आहे. त्यामध्ये आत्मविश्वासाने वावरा व जगण्याची आशा सोडलेल्यांचा आत्मविश्वास वाढवा. हे करत असताना तुम्हाला मिळालेल्या ज्ञानावर समाधानी न राहता आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवा. आई-वडील, शिक्षण संस्था यांचे नाव रोशन करा. सुदैवाने चेअरमन श्री. उमेश गाळ्वणकर यांच्यासारखी सेवाभावी व्यक्तित्व आपण शिक्षण घेत असलेल्या शिक्षण संस्थेला लाभलेले आहेत त्याचा योग्य लाभ घ्या.” असे सांगत कोरोना काळात बॅ. नाथ पै नर्सिंग विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जे काम केले ती त्यांची तुलना कशातच होऊ शकत नाही . त्या परिचारिकांनी स्वतःचे जीव धोक्यात घालून संकट काळात सामाजिक बांधिलकी जपली याचा कुडाळच्या कन्या म्हणून अभिमान आहे. पुढील काळात अश्याच सेवाभावी वृत्तीने व जबाबदारीने कार्य करणाऱ्या परिचारिकांची रुग्णांना आवशक्यता आहे नानावटी रुग्णालयात कोरोना योद्धांना परिचारिकांची आवशक्यता आहे आणि मला खात्री आहे की बॅ. नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना होणाऱ्या मी त्यासाठी त्यांना आवश्यक देण्याची माझी जबाबदारी आहे. (सौ. शलाका सावंत-परब नानावटी रुग्णालयामध्ये कोरोना काळात उत्तम सेवा बजावल्याबद्दल बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सौ. शलाका सावंत-परब या कुडाळ हायस्कूलचे भूतपूर्व कला शिक्षक सावंत सर यांच्या त्या कन्या होत.)
यावेळी विद्यार्थ्यांना श्री. उमेश गाळवणकर, प्राचार्या मीना जोशी, डॉ. सुरज शुक्ला, प्रा. अरुण मर्गज, प्रा. ज्योती सकीन-तारी यांनी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून या महाविद्यालयामध्ये मिळालेल्या उत्तम ज्ञानाबद्दल व मिळालेल्या उत्तम सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. टिना रॉड्रीक्स, राधिका सावंत यांनी केले तर कु. सलोनी वराडकर हिने उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page