You are currently viewing पिंगुळी येथिल मारामारी प्रकरणी तीघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

पिंगुळी येथिल मारामारी प्रकरणी तीघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

कुडाळ /-

तालुक्यातील पिंगुळी भुपकरवाडी येथे जमीन जागेच्या वादातुन माराहाणीची घटना घडली असून मारहाण केल्या प्रकरणी पिंगुळी भुपकरवाडी येथील तिघांवर कुडाळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत कुडाळ पोलिस ठाण्यात सोनवडेपार टेमवाडी येथील रंजना टेमकर यांनी तक्रार दिली की, तिचे माहेर भुपकरवाडी येथे असुन तिचा मुलगा भुपकरवाडी येथे राहत आहे. त्याला बरे नसल्याने ती पतीसह भुपकरवाडी येथे आली होती. दरम्यान शुक्रवार दिनांक १ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास तिच्या भावाच्या घराच्या शेजारी राहणारी आर्या अजित मुड्ये ही समीक्षा सुरेश मुंड्येला (रा. भुपकरवाडी) व तिचा नवऱ्याला जमिन व पायवाटेच्या कारणावरून शिवीगाळ करत होती. काही वेळाने समीक्षा व तिचा पती सुरेश मुंड्ये हे ग्रामपंचायत मधून घरी आले. तेव्हा अजित मुंडे याने लोखंडी शिग तर आर्या हीने हातात लाकडी दांडा घेऊन त्या दोघांनाही मारण्यासाठी धावत गेले. यावेळी आर्या हिने समीक्षाच्या केसाला धरून तिला जमिनीवर पाडुन दांड्याने समीक्षाला मारत असताना रंजना तिला सोडवण्यासाठी धावत गेली व आर्याला समिक्षाला मारू नको जे काय आहे ते आपाआपसात मिटवा असे सांगत समीक्षा हीची सोडवा सोडव करत असताना आर्या हिरे रंजना हिला शिवीगाळ करत, तुझा काही संबंध नाही असे म्हणत नवऱ्याच्या हातातील लोखंडी शिग घेऊन रंजनाच्या डोक्यावर मारून दुखापत केली. त्यामुळे रंजना जखमी होवुन खाली पडली. तर अजित व त्याचा भाऊ हेमंत मुंडये या दोघांनी मिळून समीक्षा व तिचा नवरा सुरेश या दोघांना त्यांच्या गळ्याला पकडून मारहाण केली यावेळी रंजनाचा भाऊ भरत भीमसेन मुंडये सोडवत असताना त्याला सुद्धा अजित मुंडे यांनी हाताच्या ठोशाने डाव्या डोळ्याच्या खाली मारून मुका मार दिला व शिवीगाळ केली अशी तक्रार दिली.
या तक्रारी नुसार कुडाळ पोलिस ठाण्यात आर्या मुंड्ये, अजित मुंड्ये, हेमंत मुंडये (सर्व रा. भुपकरवाडी) यांच्यावर भादवि कलम 324, 323, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यातुन देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा