You are currently viewing ‘त्या’ धुमाकूळ घालणाऱ्या माकडाचा तात्काळ बंदोबस्त करा.;त्रस्त बांदावासीयांची वनविभागाकडे मागणी..

‘त्या’ धुमाकूळ घालणाऱ्या माकडाचा तात्काळ बंदोबस्त करा.;त्रस्त बांदावासीयांची वनविभागाकडे मागणी..

बांदा /-

गेल्या वर्षभरापासून बांदा शहरात धुमाकूळ घालत असलेल्या ‘त्या’ उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यास वनविभागाला अपयश येत आहे. त्यामुळे बांदा शहरातील ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांनाही नुकसानी सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे ‘त्या’ उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी
बांदा वनपाल अनिल मेस्त्री यांच्याकडे केली आहे.

दोन दिवसांपूर्वी कट्टा कॉर्नर येथे सुजाता फोटो स्टुडिओत माकडाने केलेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांसह अन्य ग्रामस्थांनी ‘त्या’ उपद्रवी माकडास नैसर्गिक अधिवासात सोडण्याची मागणी केली. यावेळी वनरक्षक देसाई उपस्थित होते.

वनपाल मेस्त्री म्हणाले की, ‘तो’ माकड जखमी असण्याची शक्यता आहे. शहरात केलेल्या नुकसानीबाबत भरपाई देण्यासंदर्भात तसा शासन अध्यादेश नसून पंचनाम्याचा अहवाल प्रशासनास सादर करणार आहोत. काही ग्रामस्थांनी सांगितले की, अनेकदा गाड्यांचे आरसे, सीट मोडणे, पिशव्या पळविणे किंवा घरात घुसून नासधूस करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे त्या उपद्रवी माकडाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडा व आमचे नुकसान टाळा, अशी मागणी त्यांनी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा