महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागच्या कोकण विभागिय कोषाध्यक्ष पदी विश्वनाथ भला यांची निवड..

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागच्या कोकण विभागिय कोषाध्यक्ष पदी विश्वनाथ भला यांची निवड..


कुडाळ /-

दिनांक ३० सप्टेंबर रोजी रात्री महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग कोकण विभागीय कार्यकारिणी स्थापन करण्यासाठी गुगल मीट ॲपवर ऑनलाईन सभा घेण्यात आलेली होती. या सभेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विश्वनाथ झेंडू भला यांची कोकण विभाग कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी कोकण विभागीय कार्यकारिणी खालील प्रमाणे जाहीर करण्यात आली

कोकण विभाग अध्यक्ष श्री बाळकृष्ण धाऊ फर्डे (ठाणे), कोकण विभाग कार्याध्यक्ष श्री संदिप शिंदे (रायगड), श्री भूषण संखे (पालघर), कोकण विभाग कार्यवाह श्री उमेश महाडेश्वर (रायगड),कोकण विभाग कोषाध्यक्ष
श्री विश्वनाथ भला (सिंधुदुर्ग), कोकण विभाग महिला आघाडी प्रमुख सौ पूजा शहा (रायगड), कोकण विभाग उपाध्यक्ष श्री सुजित बनगर (रायगड) उर्वरित कार्यकारिणी नंतर जाहीर करण्यात येईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
या सभेला राजेश सुर्वे राज्याध्यक्ष, भगवान घरत राज्य कार्यालयीन प्रमुख, भरत मडके जिल्हाध्यक्ष ठाणे, संजय निजापकर जिल्हा अध्यक्ष रायगड, सुहास राऊत जिल्हाध्यक्ष पालघर, गणेश नाईक जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग, कोकण विभाग प्रतिनिधी संदिप शिंदे, उमेश महाडेश्वर, सुजित बनगर, पूजा शहा व रायगड, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी सभेला उपस्थित होते.

अभिप्राय द्या..