You are currently viewing संतोषी कॅटर्सचे मालक रामदास उर्फ बंड्या परब यांचे निधन..

संतोषी कॅटर्सचे मालक रामदास उर्फ बंड्या परब यांचे निधन..

कणकवली /-

कणकवली शहरातील रामदास उर्फ बंड्या कालिदास परब (46) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रामदास यांचे रेल्वे स्टेशन रोड नजीक संतोषी कॅटर्स म्हणून हॉटेल होते.उत्तम आचारी म्हणून त्यांची शहरात ओळख होती. भालचंद्र महाराज संस्थान येथे होणार्‍या धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी वाटप केला जाणार महाप्रसाद ते स्वतः बनवत असत. मन मिळावून स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार देखील मोठा होता. त्यांना दीर्घ आजाराची लागण झाल्यानंतर ते आजारातून बरे होण्यासाठी लागणार्‍या औषधोपचारासाठी त्यांना कणकवलीकरांनी मदतीचा हात पुढे केला होता. त्यांच्या अकाली निधनाबद्दल कणकवली शहरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्‍चात आई, वडिल, पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

अभिप्राय द्या..